कणकवली ( प्रतिनिधी)
भिरवंडे रामेश्वर मंदिरात ५ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन
भिरवंडे श्रीदेव रामेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील रूग्णांची विविध रक्त तपासणी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळ होणार आहे. यावेळी युरिक अॅसिड, मधुमेह रूग्णांची रक्त चाचणी, लिक्विड प्रोफाई तपासणी होणार आहे.
