कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ कणकवली तालुका अध्यक्षपदी मंगेश सावंत 

 

कणकवली (प्रतिनिधी)

कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ कणकवली तालुका अध्यक्षपदी मंगेश सावंत 

कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ रिक्षा चालकांच्या सत्कार समारंभाच्या वेळी मोटर वाहन निरीक्षक सचिन पोलादे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. मंगेश सावंत यांची निवड महासंघाचे अध्यक्ष प्रणव दादा पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व सहसचिव सुधीर पराडकर यांनी मंगेश सावंत यांची निवड जाहीर केली.

नियुक्ती पत्रामध्ये कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुका अध्यक्ष म्हणून सर्व रिक्षा टॅक्सी संघटना पदाधिकारी यांच्याशी समन्वय व संपर्कात राहालें अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोकण विभागातील जुना व कोकण विभागातील नामांकित रिक्षा टॅक्सी संघटना समन्वय व संघटन अराजकीय महासंघाचे नाव आपल्या कार्यकर्तृत्वाने उज्वल कराल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नियुक्तीपत्र देते वेळी सचिन हुंदळकर (पोलीस निरीक्षक विशेष शाखा सिंधुदुर्ग), सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जेम्स महाराष्ट्र संस्थेचे अमित पवार, संजय पन्हाळकर, आनंद चौगुले, ज्येष्ठ रिक्षा चालक मामा ओरसकर व जिल्ह्यातील रिक्षा चालक, मालक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *