निगुडे माऊली रवळनाथ परिवार पंचायतन देवतांची ७ फेब्रुवारी रोजी पुनःप्रतिष्ठापना ; ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

0 minutes, 0 seconds Read

 

बांदा (प्रतिनीधी)

निगुडे माऊली रवळनाथ परिवार पंचायतन देवतांची ७ फेब्रुवारी रोजी पुनःप्रतिष्ठापना ; ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

  निगुडे येथील श्रीदेवी माऊली रवळनाथ परिवार पंचायतन देवतांची पुनःप्रतिष्ठापना सोहळा सोमवार ३ ते शुक्रवार ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

यानिमित्त सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता मंगलाचरण, पुराणोक्त, संपूर्ण प्रायश्चित्त विधी, देवतांना निमंत्रण, गणेश पूजनादी संपूर्ण पुण्याहवाचन, संभारदान, वेदोक्त प्रायश्चितविधी, कुष्मांड होम, पवमान आवृत्या, कर्मसमाप्ती आदी धार्मिक कार्यक्रम होतील. मंगळवार ४ रोजी सकाळी ७ वाजता मंगलाचरण, प्रतिष्ठामहासंकल्प, गणेश पूजनादि नांदीश्राद्धांत पुण्याहवाचन, आचार्यादि ऋत्विकवरण, मंडप प्रवेश, आचार्य कर्म, प्राकार स्थलशुद्धी, कौतुक बंध, अंकुरा रोपण, मंडप प्रतिष्ठा, शांतीहोम, जलाधिवास आदी कार्यक्रम होतील. सायंकाळी ७ वा. गणेश जोशी गुरुजी यांचे सुश्राव्य प्रवचन व अन्य कार्यक्रम होतील.

बुधवार ५ रोजी सकाळी ७ वा. विविध धार्मिक कार्यक्रम व सायंकाळी ७ वा. गणेश जोशी गुरुजी यांचे प्रवचन व अन्य कार्यक्रम होतील. गुरुवार ६ रोजी सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. ह. भ. प. शारदा आरोंदेकर यांचे सुश्राव्य किर्तन होईल.

शुक्रवार ७ रोजी सकाळी ७ वा. मंगलाचरण, आवाहीत देवतांची पूजा, गावचे शिमधडे इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली व रोणापाल गावचे मानकरी यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजून १४ मिनिटे या शुभ मुहूर्तावर श्री मठसंस्थान दाभोली पिठाधीश श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शिखर कलशाची स्थापना होईल. तसेच स्वामीजींच्या हस्ते शिखर कलशावर ८१ कलशांचा ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषाने महाअभिषेक होईल. ९ वाजून ४८ मिनिटे या शुभमुहूर्तावर सपरीवार माऊली परमेश्वरीची पुनःप्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, तत्त्वन्यास, महापूजा, बलिदान, महापूर्णाहूती, उत्तरांगविधी, युपस्थापना, देवतांची प्रार्थना, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद आदी कार्यक्रम होतील.

दुपारी ३ वाजता पाहुणे सुहासिनी महिलांच्या ओट्या भरणे, सायंकाळी ४ वा. गावातील सुवासिनी महिलांच्या ओट्या भरणे, रात्री ८ वा. महिलांची महाआरती, ९ वा. सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी निलेश मेस्त्री व सहकारी यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान समिती, सर्व मानकरी व समस्त निगुडे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *