कुडाळच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली खा. नारायण राणे यांची भेट

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कुडाळच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली खा. नारायण राणे यांची भेट

कुडाळ नगरपंचायतवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्यासह नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, अभी गावडे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी नगरसेवक राकेश कांदे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *