सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारी रोजी वैभववाडीत 

0 minutes, 0 seconds Read

वैभववाडी (प्रतिनीधी)

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारी रोजी वैभववाडीत 

 

 

खासदार नारायण राणे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा होणार व्यापारी वर्गाच्या वतीने भव्य सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत वैभववाडी येथे संपन्न होत आहे. या मेळाव्याचे आयोजन वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य साधून मा. खासदार नारायण राणे, व मा. नामदार नितेश राणे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री, यांचा जिल्ह्यातील तमाम व्यापारी वर्गाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे, तसेच ते व्यापाऱ्यांना संबोधित करणार आहेत.
मार्गदर्शक व्याख्याते म्हणून श्री प्रसाद कुलकर्णी यांचे,यशाचे गुपित काय!,श्री अतिश कुलकर्णी व श्री विनोद मिस्त्री यांचे, हमखास यशाची योजना व श्रीकांत पाटील यांचे स्टार्ट अप इंडिया अशा विषयांवर मार्गदर्शन करतील .

महासंघाचे मानाचे पुरस्कार पुढील प्रमाणे प्रदान करण्यात येतील
जीवन गौरव पुरस्कार सन्मानित, ज्येष्ठ व्यापारी माननीय टी.एस. तथा घोणे मामा,कै.भाई भोगले स्मृति पहिल्या पिढीचा युवा व्यापारी गौरव, श्री नयन मोरे ,कै.माई ओरसकर स्मृती आदर्श महिला व्यापारी गौरव पुरस्कार, श्रीमती सरोजिनी भोवड ,आदर्श तालुका अध्यक्ष पुरस्कार, श्री श्रीराम शिरसाट कुडाळ ,कै.बापू नाईक स्मृती, जिल्हास्तरीय विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार, माचली रिसॉर्टचे संस्थापक श्री भैय्या सामंत ,कै.प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार,नांदगाव व्यापारी संघटना, नांदगाव तसेच कै.उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मेळाव्याच्या दिवशी प्रदान करण्यात येईल.व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे ३१जानेवारी २०२५ रोजी सर्व दुकाने, आस्थापने बंद राहतील, याची कृपया नोंद घ्यावी. ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *