धाकोरे बांदीवडेवाडी येथील ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणास पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन सकारात्मक चर्चा करीत प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन 

 

 

सावंतवाडी (प्रतिनीधी)

 

धाकोरे बांदीवडेवाडी येथील ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणास पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन सकारात्मक चर्चा करीत प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन 

धाकोरे बांदीवडेवाडी येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणास पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन सकारात्मक चर्चा करीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने अखेर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

धाकोरे बांदीवडेवाडी येथील रस्त्यावर गेल्या १५ वर्षांपासून अतिक्रमण झाले असल्यामुळे तेथील ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः लहान मुले, वृद्ध, दिव्यांग तसेच गरोदर मातांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून देखील कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती.या पार्श्वभूमीवर बांदीवडेवाडी ग्रामस्थांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. या उपोषणकर्त्यांची भेट घेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली तसेच ही समस्या दूर करून रस्ता वाहतुकीस खुला करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आश्वासनाअंती अखेर बांदिवडेवाडी ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. तसेच या प्रश्नी पालकमंत्र्यांनी दिलासा दिल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *