पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅन चे उद्घाटन 

0 minutes, 2 seconds Read

 

सिंधुदुर्गनगरी( प्रतिनिधी)

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅन चे उद्घाटन 

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

जिल्हा वार्षिक योजना- अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2024-25 साठी ‘सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅन आणि चित्ररथाचे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या फित कापून उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे प्रकाशन देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सौ ऋतुजा नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *