मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ ” उत्पादन वर एक दिवसीय ” क्षमता निर्माण ” कार्यक्रम देवगड येथे संपन्न

 

देवगड (प्रतिनीधी)

मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ ” उत्पादन वर एक दिवसीय ” क्षमता निर्माण ” कार्यक्रम देवगड येथे संपन्न

कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेचा पुढाकार

 

कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत MPEDA म्हणजे समुद्र उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ” मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ ” उत्पादन वर एक दिवसीय ” क्षमता निर्माण ” कार्यक्रम सोमवार दिनांक २० जानेवारी ,२०२५ रोजी देवगड येथे सकाळी १०.०० वाजता शिक्षक भवन हाॅल येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास तारामुंबरी , पुरळ, मोहूळगांव आणि हिंदळे गावांच्या कांदळवन सहव्यवस्थापन समितीतील बचत गटातील १६ सदस्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पाॅपकाॅर्न कोळंबी , बटरफ्लाय कोळंबी , कोळंबी लोणचे , जवळा चटणी , फिश बाॅल आणि फिश ब्रेड पॅटिस बनविण्याचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

या कार्यक्रमास समुद्र उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणाचे मंगेश मोहन गावडे , नेटफिश – एमपीईडीएचे जितेंद्र कदम , धीरज धात्कार , शिवली कवटकर , जागृत जोशी आणि कांदळवन प्रतिष्ठानचे केदार पालव , पुजा लुटे , राज तेली , नयन घडशी यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *