आचरा-अर्जुन बापर्डेकर
तलाठी व तलाठी कार्यालय प्रश्नी वायंगणी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
वायंगणी गावातील तलाठी कार्यालयात आठवड्यातील एक दिवस कार्यरत असणारे तलाठी त्यादिवशी देखील उपलब्ध होत नसून तलाठी कार्यालयाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. याबाबत तहसील कार्यालयाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने वायंगणी येथील ग्रामस्थ दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वायंगणीचे सरपंच रुपेश पाटकर यांच्यासह ग्रामस्थांनी मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टेय यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
