कणकवली( प्रतिनिधी)
कणकवलीत फिजीओथेरेपी सेंटर सुरू ; रोटरी क्लब कणकवलीचा स्तुत्य उपक्रम
येथील रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्यावतीने फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले. क्लबच्या वाढदिवसानिमित्त डॉ.अजित लिमये यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी डिस्ट्रिक सेक्रेटरीचे श्री.राजेश घाटवळ,श्री.प्रणय तेली. ए.जी.श्री.महादेव पाटकर,व डॉ. विद्याधर तायशेटे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे, डॉ.लीना लिमये आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ.अजित लिमये म्हणाले की समाज उपयोगी काम करण्यास जगात रोटरी अग्रेसर आहे आणि सिंधुदुर्गात कणकवली क्लब अग्रेसर आहे. कणकवलीच्या आसपासच्या चार तालुक्यातील फिजिओथेरपी सेंटर ही गरज ओळखून कणकवली क्लबने हा उपक्रम चालू केला. त्यामुळे त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सतत कार्यरत असणाऱ्या क्लबला खूप शुभेच्छा.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. जगदीश राणे म्हणाले की परमनंट प्रोजेक्ट केले की रोटरी लक्षात राहते. जसे कार्ड्यकॲम्बुलन्स, शेवपेटी, वॉटर ए.टी.एम. आणि आता फिजिओथेरपी सेंटर याचा समावेश झाला आहे आणि रोटरी पर्यायाने कणकवली रोटरी कायमस्वरूपी लक्षात राहील.
फिजीओथेरेपी सेंटरची जागा चार्टर प्रेसिडेंट श्री. दीपक बेलवलकर यांनी १० वर्षापूर्वी रोटरी कार्यालयासाठी मोफत दिली आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जानकी रामचंद्र बेलवलकर असेही त्या सभागृहाचे नामकरण करण्यात आले.
