कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चा आज समारोप ; खासदार नारायण राणे, नीलम राणे, मंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे उपस्थित राहणार

 

कणकवली (प्रतिनीधी)

कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चा आज समारोप ; खासदार नारायण राणे, नीलम राणे, मंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे उपस्थित राहणार

 

इंडियन आयडॉल सीजन १२ चा बिजेता पवनदीप राजन व उपविजेती अरुणिता कांजीलाल तसेच चेतना भारद्वाज यांचा ऑर्केस्टा होणार आहे.

कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चा समारोप १२ जानेवारी रोजी रात्री ८ वा. होणार आहे. यावेळी माजी केंद्रीयमंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे, नीलम राणे, मंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

गेले तीन दिवस कणकवली महोत्सवाला जिल्हावासियांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. राज्याचे मत्स्योद्योग व बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते ९ जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर स्थानिकांच्या कार्यक्रमांसह नामवंत गायकांचे कार्यक्रम येथे सादर झाले. यामध्ये इंडियन आयडॉलचे यशस्वी गायक सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार आदींचे कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तर महोत्सवातील खाद्य पदार्थांचे तसेच गृहोपयोगी वस्तू दागिन्यांच्या स्टॉल्सवरही मोठी गर्दी होत चांगली आर्थिक उलाढाल होत आहे. आकाशपाळणा, जम्पिंग जॅकसह विविध प्रकारच्या खेळांमुळे बालचमूही महोत्सवाला जाण्यासाठी हट्ट करीत आहे. त्यामुळे रविवारी अखेरच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

 

 

समारोपा दिवशी इंडियन आयडॉल सीजन १२ चा बिजेता पवनदीप राजन व उपविजेती अरुणिता कांजीलाल तसेच चेतना भारद्वाज यांचा ऑर्केस्टा होणार आहे. रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समीर नलावडे यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *