सिंधु गर्जना ढोलताशा पथकाचा पर्यटन महोत्सवात विशेष सन्मान

 

कणकवली (प्रतिनिधी)

सिंधु गर्जना ढोलताशा पथकाचा पर्यटन महोत्सवात विशेष सन्मान

सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा २०० वादनांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल व आतापर्यंत मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सन्मान करण्यात आला.

 

या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, अण्णा कोदे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी पथकाच्या अध्यक्षा सौ. सुरेखा भिसे, पथक प्रमुख नितीन चव्हाण, उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिला प्रमुख रिदा मंसुरी, उपप्रमुख मिनल साबळे व पथकाचे पदाधिकारी तसेच वादक उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *