कणकवली दि १० जानेवारी (तुळशीदास कुडतडकर)
कणकवली पर्यटन महोत्सवाचा आता ब्रँड तयार झालाय;कणकवलीचे नाव राज्यात आणि देशात उंचावण्याची जबाबदारी आमची – नाम.नितेश राणे
कणकवली पर्यटन महोत्सवाचे आमदार मंत्री नितेश राणेंच्या हस्ते झाले उद्घाटन
केवळ आमदार असताना कणकवली शहरात आम्ही पोतदार इंटरनॅशनल स्कुल, जाणवली नदीवरील पूल, रेल्वे स्टेशन सुशोभीकरण, सुसज्ज उद्यान, स्पोर्ट कॉम्लेक्स आणि रिंगरोडचे जाळे निर्माण करू शकलो. आता तर कॅबिनेट मंत्री आहोत. त्यामुळे पुढील पाच वर्षात कणकवली शहरात विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान झालेली दिसेल. शहराच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही.श्री. राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे. त्यामुळे कणकवली चे नाव राज्यात आणि देशात उंचावण्याची जबाबदारी आमची आहे.असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केले.
