देवगडचा पाणी समस्येवर ठोस उपाय योजना करण्यासाठी मंत्री नितेश राणे घेणार बैठक
देवगड जामसंडे नगरपंचायत अंतर्गत सध्या अनियमित व बंद असलेल्या नळ पाणीपुरवठा व योजनेबाबत नामदार नितेश राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे विकास महाराष्ट्र राज्य यांनी उद्या सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.
देवगडच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नामदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला असून यासाठी पहिली बैठक सकाळी ९ वाजता शासकिय विश्रामगृह कणकवली येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.
नामदार नितेश राणे मंत्री झाल्यापासून देवगड वासियांना पाणी प्रश्नातून दिलासा मिळाला या प्रश्न काही दिवसात निकाली लागेल असा विश्वास देवगड वासियांना वाटत आहे.