देवगड (प्रतिनिधी)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत अभिनव पद्धतीने साजरी
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली. गोगटे प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी – तन्वी अक्षिमणी साक्षात सावित्रीबाई फुले यांच्या गणवेशात अवतरताच प्रशालेच्या गेटवर मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव, सांस्कृतिक समितीच्या सचिव सौ.प्रज्ञा कांबळी , सौ.समीरा राऊत , सौ.मानसी मुणगेकर ,सौ.ज्योती गोखले व प्रशालेच्या विद्यार्थीनीनी सावित्रीबाईंवर पुष्पपाकळ्यांचा वर्षाव करत नलावडे सभागृहात अगदी सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
मुलीला शिकू द्या ,माणूस म्हणून जगू द्या, मोळी विक , पण शाळा शिक , मुलींचे शिक्षण ,प्रगतीचे लक्षण, आपल्या मुली शिकल्या छान होईल आपल्या देशाचे कल्याण ,मुलगी झाली म्हणून डोळ्यात,आणू नका पाणी शिक्षण देऊन बनवू ,तिला झाशीची राणी ,
आईबाबा मला शिकू द्या ,घाई नको लग्नाची मी शिकेन – कुटुंबाला शिकवेन मुलगी मी जिद्दीची…..अशा विद्यार्थिनीच्या घोषवाक्यांनी सारा परिसर दुमदुमून गेला .

