आचरा -अर्जुन बापर्डेकर
चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार ; उबाठा सेनेचा आचरा पोलिसांना इशारा
गेल्या वर्षभरात आचरा पोलिस कार्यक्षेत्रात सातत्याने भर दिवसा चोऱ्यांचे प्रकार घडत असून कोणत्याही चोरीचा छडा लागलेला नाही. चोरटे मोकाट असून आचरा कार्यक्षेत्रातील लोकांची प्रचंड नाराजी आहेत भंगारवाले, फेरीवाले यांचा सुळसुळाट झाला आहे आचरा पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसून येत्या 15 दिवसात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा आचरा तिठ्यावर रास्तारोको करून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आचरा पोलिसांना निवेदन देत दिला आहे.
