जामसंडे कट्टा शाळेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
जामसंडे कट्टा शाळेला शंभर वर्षे पुर्ण झाली त्याचा सोहळाही सहा महिन्यापूर्वी संपन्न झाला. ही शाळा उभारणीसाठी स्व.शंकर राघो ढोके यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे पुत्र श्री.निवृत्ती शंकर ढोके यांनी मागील शताब्दी सोहळ्यात प्रवेशद्वार उभारण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणेच स्व. शंकर राघो ढोके यांच्या नावाने हे प्रवेशद्वार उभारण्यात आले.श्री.निवृत्ती शंकर ढोके व त्यांचे पुत्र श्री.नितीन निवृत्ती ढोके व कन्या या सर्वांनी मिळून या प्रवेशद्वाराच्या खर्चाचा भार उचलला. या प्रवेशद्वारामुळे शाळा व सभोवतालच्या परिसराची शोभा वाढली. हा प्रवेशद्वार उभारणी उपक्रम “सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन (रजि.) यांच्यावतीने घडला. यासाठी सहकार्य जि.प.शिक्षण मंडळ, देवगड व कट्टा शाळा व्यवस्थापन व कट्टा ग्रामस्थांचे लाभले.
या प्रवेशद्वाराचे उद्घाटन देवगडचे उद्योजक श्री. प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डाॅ.गुरुदेव परुळेकर, श्री.अनिकेत बांदिवडेकर, श्री. बलवान सर , डाॅ.भाई बांदकर व श्री.प्रकाश कोयंडे, बांधकाम व्यवसयिक दिपक कांबळी हे उपस्थित होते.