सावंतवाडी (प्रतिनीधी)
चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेच्या कामाचा आमदार दीपक केसरकर यांनी घेतला आढावा
चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत बैठक झाली. यात सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सरकते जिने, पन्नास वुडन काॅटेजीस आणि जलजीवन योजनेतून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकावर पन्नास उडन कॉटेजीस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत आराखडा सादर करण्याचे निर्देश दिल्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच रेल्वे स्थानकावर जलजीवन मधून पाणी योजना मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभागृहात बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच अधिकारी उपस्थित होते.
