यश प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करा ; तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

कणकवली (प्रतिनिधी)

यश प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करा ; तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

फोंडाघाट येथील मराठे कृषी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम

 

 

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येकाच्या जीवनात सहजासहजी यश प्रास होत नसते. विद्याथ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जीवनात यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.

 

 

ब्राह्मणेश्वर शैक्षणिक, सामाजिक, उन्नती मंडळ फोंडाघाट संचलित कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, श्रीमती सुमती मराठे कृषी तंत्रनिकेतन कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा) फोंडाघाट यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ “मृदंगध २०२४” च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

 

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष दीपेश मराठे, संजय गांधी विभाग अंधेरी मुंबईचे तहसीलदार आर. जे. पवार, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, कायदेशीर सल्लागार मिताली मराठे, संचालिका विद्या राणे पाटील, प्राचार्य पी. आर. संते, प्राचार्य जे. जे. राऊळ, प्रा. खांबल, संचालक जनार्दन देसाई, प्रशांत पाटील व मान्यवर उपस्थित होते.

 

 

श्री. देशपांडे म्हणाले, एमपीएससी, यूपीएससी आदी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. सुरुवातीला आपल्याला परीक्षेत अपयश येते. मात्र अपयश आले म्हणून थांबू नका, अभ्यासात सातत्य ठेवा, मागच्या परीक्षेत आपले काय चुकले याचे आत्मचिंतन करा, चुका सुधारुन जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याचा बारकाईने अभ्यास करा, त्यानंतर तुम्हांला शेवटी चांगले यश मिळेल. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करा, सुरुवातीला अपयश आले म्हणून घाबरु नका.पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहा.शेवटी यश मिळेल असे सांगितले.

 

अध्यक्ष दीपेश मराठे म्हणाले, आपल्या अंगीभूत सुप्त गुणांना चालना देऊन येणाऱ्या संकटाना सामोरे जा, भविष्यात गावचे व आई वडिलांचे नाव उज्वल करा,

 

 

तहसीलदार आर.जे. पवार म्हणाले, विद्याध्यर्थ्यांनी पारंपारिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. तरुण पिढीने रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेऊन आपली व समाजाची उन्नती साधावी. मंडळ अधिकारी दिलीप पाटील, विद्यार्थी प्रसाद धमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

 

क्रिकेट, कबड्डी, खो खो, बुद्धीबळ, हॉलीबॉल, टेबलटेनिस, थाळीफेक, रनींग, रस्सीखेच या खेळांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्याध्यर्थ्यांना प्रशस्तीपत्र, पुष्प व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य पी. आर. संते यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रुपाली ढोले,प्रा.रजनी किल्लेदार यांनी केले.आभार डॉ.दर्शन कदम यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *