वेंगुर्ला (प्रतिनिधी)
कुडाळ पोलिसांनी व्हिडिओ गेम पार्लरवर अचानक छापा टाकला. व गेम पार्लरमधील यंत्रसामग्री व रोख रक्कम जप्त
कुडाळ पोलिसांनी व्हिडिओ गेम पार्लरवर अचानक छापा टाकला. व गेम पार्लरमधील यंत्रसामग्री व रोख रक्कम जप्त केली.कुडाळ शहरामध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये पैसे देऊन सट्टा खेळला जातो अशी माहिती कुडाळ पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्यात काही जण पैसे लावून सट्टा खेळत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी व्हिडिओ गेम पार्लरमधील मशीन तसेच खेळली जाणारी रोख रक्कम जप्त केली. हे कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
