कणकवली (प्रतिनिधी)
भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी मंत्री नितेश राणेंना दिल्या शुभेच्छा !
सर्व हिंदूना आमदार नितेश राणे यांच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या निवडीमुळे अधिक ताकद मिळाली आहे – मिलिंद मेस्त्री
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नितेश राणे यांची नागपूर येथील विधानभवनात भेट घेत भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशनात मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील पहिल्या दिवशी नामदार नितेश राणे यांचे विधिमंडळात आगमन झाले. मिलिंद मेस्त्री यांनी यावेळी मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा दिल्या.
कणकवली मतदारसंघाचे आमदार. नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्याने आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती येणार आहे. आ. राणे यांनी गेल्या दहा वर्षात कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघात विकासाची गंगा आणली. संपूर्ण हा मतदारसंघ भाजपमय केल्याने ते प्रचंड मताधिक्याने विजयी झालेत.
ते हिंदुरक्षक असल्याने त्यांच्याकडे तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हिंदू आशेने पाहत आहे. त्या सर्व हिंदूना आमदार नितेश राणे यांच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या निवडीमुळे अधिक ताकद मिळाली आहे, आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाला गती मिळेल त्यामुळे हा जिल्हा विकासात महाराष्ट्रात प्रथम राहिल.अशी प्रतिक्रिया भाजप कणकवली तालुकाध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री यांनी व्यक्त केली.
