ग्रामपंचायत चिंदर येथे 14 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

ग्रामपंचायत चिंदर येथे 14 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

चिंदर ग्रामपंचायत व निर्भया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बसरेवाडी तालुका भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 14 डिसेबर रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायत चिंदर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात जेष्ठ नागरिक वृद्ध महिला यांची मोफत आरोग्य तपासणी,
40 वर्षावरील  नागरीकांची मोफत मधुमेह, रक्ततपासणी, बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे .तसेच मोफत औषध पुरवठा,मोफत नेत्र तपासणी होणार आहे.

या शिबिराचे उदघाटन चिंदर सरपंच नम्रता महंंकाळ उर्फ स्वरा पालकर ,उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी सरपंच संतोष कोदे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष गांवकर, प्राथमिक आरोग्य केंद्र आचराचे डॉक्टर कपिल मेस्त्री, माजी सभापती हिमाली अमरे,रामेश्वर सोसायटी चेअरमन सिताराम हडकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत चिंदर यांच्या कडून करण्यात आले आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *