कणकवली (प्रतिनिधी)
भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भक्तांची अलोट गर्दी
भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भाविक भक्तांची अलोट गर्दी होत आहे. या महोत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हावून निघाली आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे ते म्हणजे नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन महोत्सवाचे. कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते. विविध विषयांवरील कीर्तनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध होत आहेत.
