सावंतवाडी (प्रतिनिधी)
आरोस माऊली देवीची 9 डिसेंबरला वार्षिक जत्रोत्सव
सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव ९ डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी श्री देवीची विधीवत पूजा, ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे, अखंड दर्शन सोहळा, रात्री ११ वाजता तरंगांसह पालखी सोहळा, त्यानंतर दशावतारी वालावलकर नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
