परमहंस भालचंद्र महाराज यांचा बुधवार ४ डिसेंबर पासून ४७ वा पुण्यतिथी महोत्सव ! ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम;तयारी पूर्ण

0 minutes, 2 seconds Read

 

 

कणकवली दि ३ नोव्हेंबर (तुळशीदास कुडतरकर) 

परमहंस भालचंद्र महाराज यांचा बुधवार ४ डिसेंबर पासून ४७ वा पुण्यतिथी महोत्सव ! ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम;तयारी पूर्ण

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाला ४ डिसेंबर पासून पहाटे काकड आरतीने प्रारंभ होणार आहे. ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आश्रमात होणार आहेत. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई,पुणे तसेच इतर भागातील भाविक कणकवलीत उत्सवाच्या निमित्ताने दाखल झाले आहेत.

४ डिसेंबर पासून पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन, काकडआरती, सकाळी ८.३० ते १२.३० सर्वभक्त कल्याणार्थ धार्मिक विधी -भालचंद्र महारूद्र महाभिषेक अनुष्ठान, दुपारी १२.३० ते १ आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ४ वाजेपर्यंत भजने, सायंकाळी ४ ते ७.३० वाजेपर्यंत कीर्तन महोत्सव, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत.

तर रविवार ८ डिसेंबर रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी दिन आहे. पहाटे ५.३० ते ८ समाधीपूजन, काकडआरती, जपानुष्ठान, सकाळी ८ ते १०.३० भजने, सकाळी १०.३० ते १२.३० समाधीस्थानी मन्यूसूक्त पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० ते १ आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी १ ते ५ भजने, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची भक्तगण व सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्यासमवेत कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यानंतर आरती तर रात्री ११ वाजता दशावतारी नाटक – पुण्यप्रभाव (भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल) असे कार्यक्रम होणार आहेत. मंदिर परिसराची रंगरंगोटी तसेच सुशोभीकरण करण्यात आले असून या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. पुढील पाच दिवस कणकवली शहर भक्तिरसात न्हावून निघणार आहे.

            कीर्तन महोत्सवाची महापर्वणी!

४ ते ७ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ४ ते ७.३० या वेळेत ९ वा कीर्तन महोत्सव होणार आहे. ४ डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प.लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी (रा. बीड) विषय – शिव समर्थ योग, ५ डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प. नम्रता व्यास-निमकर (रा. पुणे) विषय- गावबा (संत एकनाथ महाराज), ६ डिसेंबर रोजी कीर्तन चंद्रीका ह.भ.प. मानसी बडवे (रा. पुणे) विषय – ब्रम्हानंद महाराज, ७ डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प.मोहक रायकर (रा. डोंबिवली) विषय- श्रीराम भक्त शबरी अशा विषयांवर कीर्तने होणार आहेत.भाविकांसाठी ही एक महापर्वणीच आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *