देवगड तहसीलदार कार्यालय येथे भारतीय संविधान दिन साजरा

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तहसीलदार कार्यालय येथे भारतीय संविधान दिन साजरा

देवगड तहसिलदार कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्‍यात आला. संविधान जनजागृती करण्‍यासाठी आणि आंबेडकरांच्‍या विचारांचा प्रसार करण्‍याच्‍या देशभरात २६ नोव्‍हेंबर हा दिवस ‘ संविधान दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. महाराष्‍ट्र शासनाच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाने २४ नोव्‍हेंबर,२००८ ला आदेश काढून २६ नोव्‍हेंबर हा दिवस ‘ संविधान दिन’ म्‍हणून साजरा करण्‍याचे घोषीत केले होते.

संविधान दिनानिमित्‍ताने तहसिलदार लक्ष्‍मण कसेकर यांनी सर्व कर्मचारी यांना संविधानाच्‍या शुभेच्‍छा प्रदान केल्‍या. सर्वकर्मचारी वर्गासोबत संविधान उद्देशिका वाचन करून ग्रहण करण्‍यात आली. यावेळी निवासी नायब तहसिलदार विवेक शेट, महसूल नायब तहसिलदार श्रीकृष्‍ण ठाकूर, पुरवठा नायब तसिलदार श्री.गुटे, महसूल अका विलास चव्‍हाण, सुचिता अडारकर, व्‍ही.टी.खोडे, श्री.बेबले, व्‍ही.जी.जांभेकर, महसूलसहाय्यक , संगणक ऑपरेटर, शिपाई, तलाठी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *