सावंतवाडी (प्रतिनिधी)
मी जनतेची उमेदवार असून जनता माझ्या पाठीशी ; अपक्ष उमेदवार अर्चनाताई घारे परब यांनी बजावला मतदानाचा हक्क
मी जनतेची उमेदवार असून जनता माझ्या पाठीशी आहे. माझी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक बांधिलकी आणि एकूणच माझी कार्य करण्याची पद्धत ही सामान्य जनतेला आवडली आहे. त्यामुळे विजयाची संपूर्ण खात्री आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार अर्चना घारे – परब यांनी व्यक्त केला.
