देवगड जामसंडे नगरपंचायत कचरा प्रश्न,पाणी प्रश्न आम.नितेश राणे,व भाजप नगरसेवक ,यांच्या माध्यमातून मार्गी-योगेश चांदोस्कर
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील घन कचरा हा गेले तीन दिवस नागरिकांकडून उचलला त जात नसून कचरा संकलन करण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाने बंद केले आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट कल्पना देणे गरजेचे होते. परंतु तसे न होता निव्वळ विरोधी भाजप नगरसेवकांची बदनामी करणे याकरिता सत्ताधारी उबाठा शिवसेना नगरसेवक खोटे आरोप अपप्रचार करून संकलनाचे माजी भाजप नगराध्यक्षामुळे ठप्प झाले आहे.असा आरोप करून देवगड जामसंडे वासीयांची दिशाभूल करीत आहेत.देवगडचा कचरा प्रश्न व पाणी प्रश्न वारंवार भाजप नगरसेवक यांचे माध्यमातून आम.नितेश राणे यांच्या मार्गदर्शतूनच सुटला आहे. त्यामुळे यापुढील काळात देखील भाजप नगरसेविका तन्वी चांदोस्कर व आपण माजी नगराध्यक्ष या कचरा डंपिंग करिता जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत स्वतःची जागा मोफत उपलब्ध करून दिली आहे.शिवसेना उबाठा नगरसेवक बुवा तारी यांनी नाहक अपप्रचार करू नये प्रसंगी १७ प्रभागातील कचरा घरा नजीकच्या जागेत डंपिंग करीत असताना किमान एका स्वतःच्या प्रभागातील कचरा बुवा तारी यांनी आपल्या जागेत साठवून दाखवावा असे आव्हानही माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले .
यावेळी युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर चंद्रकांत कावले,उपस्थित होते. देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयानजीक कचरासाठविण्याची काम सुरू असताना त्याबाबत नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर माजी नगराध्यक्ष या नात्याने आपण आपली स्वतःची जागा देऊन सदरचा १७ प्रभागाचा कचरा आपल्या जागेत आपण संकलित केला असे असताना त्यानंतर नगरपंचायतीच्या माध्यमातून अन्यथा जागा पाहणी करण्यात आली व तसा करारही करण्यात आला परंतु त्या जागेपर्यंत जाण्याकरता आवश्यक असणाऱ्या वाटे संदर्भात वाद निर्माण झाल्याने पुन्हा एकदा गेली महिनाभर कचरा संकलनाची सुरू असलेले काम बंद झाले असे असताना नगरपंचायत प्रशासन अथवा सत्ताधारी नगरसेवकांनी याबाबत कोणतीही कल्पना न देता निव्वळ कचरा संकलन बंद होण्याचे खापर विरोधी नगरसेवकांवर फोडून अपप्रचार व बदनामी करणे सुरू केले हे पूर्णतः चुकीचे असून यापूर्वी आपण आपल्या मालकीची जागा कचरा डम्पिंग करता दिली होती त्या जागी जोपर्यंत नव्याने घेतल्या जागेचा वाद सुटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी डम्पिंग करण्यास आपली पूर्ण सहमती असल्याची स्पष्ट माहिती माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी सांगून गेली तीन दिवस देवगड जामसांडे शहरातील कचरा संकलन न करण्यामुळे न झाल्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे.
यापूर्वी देखील कचरा डंपिंग करण्याकरता आवश्यक असलेली जागा आपण स्वतः नगरसेवक तन्वी चांदोस्कर यांनी आपल्या मालकीची जागा देऊन तो प्रश्न मार्गी लावला होता १७ प्रभागांचा कचरा आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत डम्पिंग केल्यानंतर किती त्रास होतो हे अनुभव देखील आपण घेतला निव्वळ जनतेच्या जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून आपण ही जागा उपलब्ध करून दिली होती परंतु सत्ताधारी नगरसेवक निवृत्ती तारी यांनी निव्वळ विरोधी भाजप नगरसेवकांची बदनामी करावी व माजी नगराध्यक्षांवर टीका करावी एवढाच हेतू ठेवून काही खोटे आरोप केले होते या संदर्भात जनतेला वस्तुस्थिती ज्ञात असणे गरजेचे असून त्यासाठी आपण जनतेला ज्ञात करीत आहोत नगरसेवक निवृत्ती नगरसेवक खोटे व चुकीचे आरोप करून येथे विकास कामांना खो घालत आहेत कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला असताना देखील तो निधी अडवून परत पाठविला आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत यापूर्वीच्या सत्ताधारी नगरपंचायत नगरसेवकांनी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पवनचक्की गार्डनमुळे येथील अर्थकारण बदलले .येथे पर्यटनाचा ओघ वाढला व तेथील स्थानिक कुटुंबांना रोजगार निर्माण केला गेला असे असताना देखील या कुटुंबांच्या विरोधात नेहमी बुवा तारी यांनी विरोध करून देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न असो अथवा कचऱ्याचा प्रश्न असो ते सोडविण्याचे काम भाजपच्या नगरसेवक मार्फत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातूनच आज पर्यंत होत आहे त्यात बुवा तारी यांनी लुडबुड करू नये असा सबुरीचा सल्लाही त्यांनी देऊन घरोघर नगरपंचायत जात असताना जनतेने या एकंदर परिस्थितीचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
नगरपंचायतीमध्ये आम. नितेश राणे यांचे विजय निश्चित असून नगरपंचायत माध्यमातून आजपर्यंत देवगड जामसांडेचा विकास आम.नितेश राणे यांच्या मुळेच होत आहे देवगड जांमसंडे ते नगरपंचायतीमधील सर्व कर्मचारी यांच्याशी देखील नगरसेवक या नात्याने आपले जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्या समस्या सोडविण्यात देखील भाजपच्या नगरसेवकांनी यापूर्वी ठोस भूमिका बजावली होती आमदार नितेश राणे हे खऱ्या अर्थाने व्हिजनरी नेते असून देवगड शहरातील समस्या सोडविण्याकरिता नेहमीच त्यांनी प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे येथील तज्ञ जनता सुज्ञ मतदार जाणकार असल्यामुळे१७ प्रभागातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे सत्ताधारी नगरसेवक संतोष तारी यांच्या प्रभागात देखील आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ४० लाख रुपयांचा निधी ह्या उपलब्ध झाला असून नागरिकांसाठी हा ,निधी आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला हे येथील जनतेला ज्ञात आहे त्याची प्रशासकीय मान्यता व टेंडर मिळाले असून लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येऊन या कार्यक्रमाला देखील त्या प्रभागातील नगरसेवक संतोष तारी यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती योगेश चांदोस्कर. यांनी यावेळी बोलताना दिली