कासार्डे कॉलेजची नेहा कदम कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत तृतीय

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कासार्डे कॉलेजची नेहा कदम कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत तृतीय

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी रत्नागिरी यांच्यावतीने एस व्ही जे सी टी क्रीडासंकुल डेरवन सावर्डे जि.रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये एकूण १४ खेळाडू सहभागी होतें पैकी कु.नेहा संतोष कदम (इयत्ता ११वी विज्ञान) हीने चमकदार कामगिरी करत तिहेरी उडी या मैदानी क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक प्रा दिवाकर पवार, विनायक पाताडे ,अनंत कानेकर,अनिल जमदाडे, देवेंद्र देवरुखकर,यशवंत परब,नवनाथ कानकेकर,ऋचा सरवणकर, तृप्ती कुडतरकर,दिपाली मिठबावकर,वैष्णवी डंबे यांच्यासह विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे, व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालय पालक-शिक्षक संघ आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही राणे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *