देवगड (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणूक समन्वयक म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांची नियुक्ती
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून २० नोव्हेंबर रोजी निवडणुका होत आहेत.
या निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा निवडणूक समन्वयक म्हणून भाजप नेते माजी आमदार प्रमोद शांताराम जठार यांची नियुक्ती महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नुकतेच त्यांना त्यांच्या निवडीचे पत्रही प्राप्त झाले आहे.
