माजी आमदार परशुराम उपरकर हे मुंबई ला रवाना झाले असून काही वेळातच मातोश्रीवर दाखल होत आहेत. दुपारी त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात नेमका महायुतीच्या विरुद्ध कोणता उमेदवार असणार हे देखील आजच समजणार असल्याचेही बोलले जात आहे.