कणकवली दि १८ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
अल्बेनियातील वरिष्ठ गट महिला जागतिक कुस्ती स्पर्धेच्या भारतीय संघाच्या कोच म्हणून माधुरी घराळ यांची निवड
अल्बेनिया येथे होणाऱ्या जागतिक वरिष्ठ गट महिला कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कोच म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्या कुस्ती कोच ( मार्गदर्शक )श्रीम.माधुरी घराळ यांची निवड झाली असून त्या दि. २८ ते ३१ ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय संघाच्या कोच म्हणून कामगिरी पार पाडणार आहेत. यापुर्वीही त्यांनी तब्बल सात वेळा भारतीय महिला कोच म्हणून कामगिरी बजावली आहे. त्या स्वतः राष्ट्रीय पदक विजेत्या कुस्ती खेळाडू आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हाअधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद अनिल पाटील ,सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांनी तसेच महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ व कुस्ती परिषदेने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
