सावंतवाडी (प्रतिनिधी)
आडेली येथे आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात
आडेली मध्ये एकपात्री अभिनय. सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो तर्फे काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली येथे आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात पार पडली .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबईचा डबेवाला या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री मनोहर सरवणकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून आपली सिंधुनगरी न्यूज चॅनल संचालक श्री सुयोग पंडित, संचालिका फिलोमीना पंडित, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जेष्ठ पत्रकार समाजसेविका श्रीमती मंगल कामत, आडेलीच्या सरपंच सौ यशस्वी कोंडसकर, वजराठ गावच्या सरपंच सौ अनन्या पुराणिक , विष्णू कोंडसकर, उदय आडेलकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून उत्तम रित्या सर्वानी सादरीकरण केले.
स्पर्धेत शुभम गोविलकर ( रत्नागिरी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यांना रोख रक्कम १२०० रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. द्वितिय क्रमांक कुंदन सागवेकर ( रत्नागिरी) यानी पटकावला असुन त्यांना रोख रक्कम -८०० रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर तृतिय क्रमांक श्रावणी आरावंदेकर ( सिंधुदुर्ग) हिने पटकावला असुन रोख रक्कम -५०० रुपये, सन्मान चिन्ह , सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत त्याचबरोबर गजेंद्र कोठावळे ,सर्वज्ञ वराडकर ,दिक्षा मराळ, उदय मयेकर ,वीर गावडे,श्रमिका आरावंदेकर ,पायल गावडे, जान्हवी कांबळी ,महिमा नार्वेकर ,वेंदांत वेंगुर्लेकर या दहा स्पर्धेकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. त्यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांमकर आणि सिरियल अभिनेत्री सौ.कांचन धर्णे गावडे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुरूनाथ धर्णे , काजल गावडे,मिलिंद धर्णे, ओमकार धर्णे यांनी विशेष प्रयत्न केले.
