मळगाव हायस्कूल येथे “साधना कला अकादमी” सुरु… ; भगीरथ प्रतिष्ठानच्या डाॅ. प्रसाद देवधर यांच्याकडून साहित्यासाठी मिळाली मदत…

0 minutes, 0 seconds Read

सावंतवाडी (प्रतिनिधी)

मळगाव हायस्कूल येथे “साधना कला अकादमी” सुरु… ; भगीरथ प्रतिष्ठानच्या डाॅ. प्रसाद देवधर यांच्याकडून साहित्यासाठी मिळाली मदत…

सध्याच्या घडीला शिक्षणासोबत मुलांना संगीताची गोडी निर्माण व्हावी, मुलांनी कला साधनांकडे वळावे, यासाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मधील विद्यार्थ्यांसाठी “साधना कला अकादमी” स्थापन करण्यात आली आहे.

दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या ठिकाणी कला साधना चे उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगीरथ प्रतिष्ठान चे डॉक्टर श्री.प्रसाद देवधर उपस्थित होते.
या अकादमीसाठी भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.श्री. डॉक्टर प्रसाद देवधर यांनी शाळेसाठी पेटी, तबला, ढोलकी, चायना ब्लॉक तसेच मंजिरी अशा प्रकारचे साहित्य पुरविले.

भगीरथ प्रतिष्ठान ही फक्त जिल्ह्यात नाही तर संपूर्ण जगभर ही संस्था मोठी सामाजिक कार्य करते आणि या कामात अध्यक्ष डॉक्टर देवधर यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच यापूर्वी सुद्धा भगीरथ प्रतिष्ठानकडून शाळेला बरीच मदत झाली व यापुढे आपण तशी मदत करू, असे आश्वासन डॉक्टर देवधर यांनी आजच्या कार्यक्रम वेळी दिले.
आजच्या या कार्यक्रमासाठी संस्था सचिव मा. श्री. आर.आर. राऊळ सर यांनी फोन करून डॉक्टर देवधर, स्कूल कमिटी तसेच नवीन चालू करण्यात आलेल्या साधना कला अकादमीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन श्री. मनोहर राऊळ सर, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या “साधना कला अकादमी” मध्ये प्रवेश घेण्यासाठी श्री. प्रकाश केसरकर ९५७९८३२०६९ यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *