अँड अविनाश माणगावकर यांना मातृशोक

0 minutes, 0 seconds Read

देवगड – प्रतिनिधी

अँड अविनाश माणगावकर यांना मातृशोक

मूळ पाटगाव येथील श्रीमती सुलभा मनोहर माणगावकर (९२) यांचे देवगड येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री ८ वा. च्या सुमारास निधन झाले. पार्थिवावर शनिवारी सकाळी पाटगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पश्चात दोन मुलगे, चार मुली, तीन सुना, जावई, नातवडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. देवगड येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. अविनाश माणगावकर यांच्या त्या आई, देवगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या महाव्यवस्थापिका सौ. विद्या माणगावकर यांच्या त्या सासू होत. तर ॲड. सिद्धेश माणगावकर यांच्या त्या आजी, ॲड. श्रुती माणगावकर यांच्या त्या आजीसासू होत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *