कणकवली दि.५ ऑक्टोंबर (तुळशीदास कुडतरकर)
हत्ती घूस रेडा गेंडा’ या नाटकाचा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याहस्ते झाला शुभारंभ ; पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाला
‘हत्ती घूस रेडा गेंडा’ या नाटकाचा शुभारंभ २ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याहस्ते झाला. आचरेकर प्रतिष्ठान इथं झाला. महात्मा गांधी अणि लाल बहादूर शास्त्री या दोन महान महापुरुषांच्या जयंती दिनी हत्ती घूस रेडा गेंडा या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग आचरेकर प्रतिष्ठान तर्फे कणकवली येथे संपन्न झाला. पहिलाचा शुभारंभ प्रयोग हाऊसफुल्ल झाला याशिवाय जवळपास १०० पेक्षा अधिक रसिक प्रेक्षकांना परत जावे लागले. ह्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे रसिक प्रेक्षकांना एक तास ४० मिनिटे खिळवून ठेवणारा हा प्रयोग आहे, असे मत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केले.
प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या विचारला व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करते. त्याच्या विचाराला हत्तीचे बळ देते अशी अजरामर कलाकृती आहे. या नाटकाची जोरदार चर्चा सध्या कणकवली येथे सुरू आहे ही बाब आचरेकर प्रतिष्ठान च्या दृष्टीने खूप कौतुकाची अणि अभिमानाची सुद्धा आहे. हे नाटक प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे असे आहे असे म्हंटले तर अजिबात वावगे होणार नाही. मी एक रसिक आहे शिवाय एक सृजनशील अणि संवेदनशील अधिकारी आहे.
