कणकवलीत भव्य आरक्षण बचाव रॅलीला सुरुवात..समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली दि ५ ऑक्टोबर (तुळशीदास कुडतरकर)

कणकवलीत भव्य आरक्षण बचाव रॅलीला सुरुवात..समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आरक्षण रद्द करण्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्य वरुन भाजप आणि आरक्षित समाज संघटित झाला असून. आज कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघात कणकवली येथे आरक्षण बचाव रॅलीला आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

जानवली येथून या रॅलीला शनिवारी सकाळी 10 वाजता सुरवात झाली. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली आहे. कणकवली, वैभववाडी देवगड या तिन्ही तालुक्यातील आरक्षित समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल गांधी यांचा निषेध असो…. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे…. काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो….अश्या घोषणा देत मुंबई गोवा महामार्गावरून रॅलीने कणकवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दिशेने सुरु झाली. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *