इंटरनेट स्मार्टफोनमुळे जग बदललेले आहे – मुक्ता चैतन्य

0 minutes, 0 seconds Read

 

 

बांदा (मंगल कामत)

इंटरनेट स्मार्टफोनमुळे जग बदललेले आहे – मुक्ता चैतन्य

इंटरनेटने, स्मार्ट फोन व सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदलले आहे. माणसाचा सामा डीएनए या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे. त्य तांत्रिक शिक्षणाकडून माध्यम शिक्षणाकडे आपल्याला लागेल, काळाची ती गरज आहे. माध्यम शिक्षित होण एव आपल्या हातात राहीले आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर घालण्यासाठी आधी स्वतःलाही त्यावर आवर घातला पा असे प्रतिपादन सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित मोबाईलच करायचं काय ? या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या ब होत्या. मुक्ता चैतन्य म्हणाला, तांत्रिक शिक्षणाकडून मा शिक्षणाकडे आपल्याला जावे लागेल काळाची ती गरज इंटरनेटने आपल्याला एकमेकांच्या फार जवळ आणले आहे स्मार्ट फोन अन् सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदलले आपले जगणे सर्वार्थाने बदलले असून माणसाचा सामा डीएनए या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे.

फेसबुक, व्हॉट्सअॅप, युट्यूब ही प्रॉफिट मिळवणारी बिज्ञ माध्यम आहे ही माध्यमे म्हणजे एनजीओ नाहीत.फेसबुक, व्हॉट्सअॅप, युट्यूब ही प्रॉफिट मिळवणारी बिझनेस माध्यम आहे. ही माध्यमे म्हणजे एनजीओ नाहीत. त्यामुळे ग्राहक म्हणून याचा आपण विचार केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल.तंत्रज्ञान बदलात माध्यम शिक्षित होण एवढेच आपल्या हातात आहे. मोबाईल नावाचे गॅझेट पुढील काही वर्षांत संपून जाणार आहे. कारण, दुसऱ्या पद्धतीच तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. बाजारत ते आले आहे. कल्पनाही करु शकत नाही अशा पद्धतीत ते विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान जसे फायद्यासाठी वापरल जात तसे ते सायबर गुन्हेगारांच्या हातातही आहे हे विसरून चालणार नाही. एआय मुळे तुमचा फोन तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. फोन आपला शत्रू नाही. पण, तो किती वापरायचा हे महत्त्वाचे आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर आवर घालण्यासाठी आधी स्वतःही त्याला आवर घातला पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच सायबर क्राईमची फार गंभीर परिस्थिती आहे. मोह आड येतो अन् फसवणूकीचे प्रकार घडतात. क्रिमीनल्स तुमच्यापर्यंत पोहचणार नाही या भ्रमात राहू! नका. डिजीटल स्पेस वापरताना काळजी घ्यावीच लागेल. सायबर जगात अलर्ट राहाणे व ते मुलांना शिकवण आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या माध्यमातून मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ? या कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी मार्गदर्शन केले.

सायबर जगात अलर्ट राहाणे व ते मुलांना शिकवण आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या माध्यमातून मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ? या कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात अॅड. संदीप निंबाळकर यांनी केले. यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, अॅड. परिमल नाईक, फादर मिलेट डिसोझा, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, लक्ष्मीकांत खोबरेकर, महेश परुळेकर, अॅड. शामराव सावंत, अॅड. पी.डी.देसाई आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *