मळेवाड जकातनाका येथील गटार साफ करा ,हेमंत मराठे यांची मागणी

0 minutes, 1 second Read

मळेवाड जकातनाका येथील गटार साफ करा ,हेमंत मराठे यांची मागणी

 

सावंतवाडी – प्रतिनिधी १५ जुलै २०२४

 

 

मळेवाड जकातनाका व चव्हाणवाडी परिसरातील गटारे मातीने बुजली आहेत.यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून सर्वत्र माती पसरत असून पादचारी व वाहन चालक यांना धोकादायक बनत आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने मळेवाड जकातनाका परिसरातील व्यापारी व ग्राहक यांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कडे मळेवाड जकातनाका व चव्हाणवाडी परिसरातील बुजलेले गटार तात्काळ साफ करा अन्यथा रस्त्यावरच आंदोलन इशारा दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *