कणकवली दि १९ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)
आकर्षक विद्युत रोषणाईने जानवली नदी पूल झळकला ; गणपती साना येथे झाले बाप्पांचे विसर्जन
कणकवलीतील जानवली गणपती साना येथे अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यानिमित्त सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेला जानवली नदीवरील पूल आकर्षक अशा विद्युत रोषणाईने झळकला होता. त्यामुळे गणेश भक्तांचे हा पूल आकर्षण ठरला होता.अनेकांनी पुलावर उभे राहून गणपती सान्यावरील गणेश विसर्जन सोहळ्याचा आनंद घेतला.
कणकवली आणि जानवलीला जोडणारा गणपती सान्यानजीकचा हा पूल सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून यावर्षी पूर्ण झाला आहे. विक्रमी कालावधीत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले होते. पुलाचे काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूने जोड रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या पादचारी आणि वाहनचालकांची सोय झाली आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी
दिवशी गणपती साना येथे गणेश विसर्जन करण्यात आले. यानिमित्त या पुलावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. अनेकांनी पुलावर उभे राहून विसर्जन सोहळा पाहिला. सर्वांच्याच आकर्षणाचा हा पूल केंद्रबिंदू ठरला.
