बांदा मंगल कामत ४ सप्टेंबर २०२४
बांदा गोगटे- वाळके कॉलेजमध्ये २५ सप्टेंबरला “चंद्रकला करंडक” राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
बांदा येथील गोगटे- वाळके कॉलेज मध्ये २५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता “चंद्रकला करंडक” राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वक्तृत्व स्पर्धेसाठी शिक्षणातून मला काय हवे?, सुजाण पालकत्व : वास्तव आणि अपेक्षा, भारतीय पारंपरिक खेळः अंस्तगत होत आहेत का?, माझ्या संकल्पनेतील आदर्श गाव, व्यसन सोशल मीडियाचे; पालटले चित्र समाजाचे….! हे विषय देण्यात आले आहेत.
दरम्यान एका स्पर्धकासाठी किमान सात मिनिटे वेळ देण्यात येईल. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५ हजार, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय ३ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय २ हजार व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक १ हजार व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येक शाळेतून तीन स्पर्धक सहभागी होऊ शकतील. याबाबत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी २२ सप्टेंबर पूर्वी स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर (9423304414) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोगटे- वाळके कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.
