कणकवली दि ३ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कासार्डे विद्यालयाच्या ३ खेळाडूंची निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील १२ वी वाणिज्य शाखेचा खेळाडू सुरज तांबे याने १९ वर्षे वयोगटात कणकवली तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला, तर आर्यन पोयरेकर ११ वी वाणिज्य याने चौथा क्रमांक पटकावला आहे याच वयोगटात मुलींमध्ये पूर्वा रावराणे १२ वी विज्ञान हिनेही मुलींच्या गटातून चौथा क्रमांक पटकावला आहे.कणकवली तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा विद्यामंदिर प्रशाला कणकवली येथे पार पडल्या.
या यशस्वी तीन खेळाडूंची कणकवली येथे ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रा. विनायक पाताडे, अवधूत कानकेकर,अनंत काणेकर, क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा.दिवाकर पवार व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबई अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याअध्यक्ष संजय पाताडे, संकुल समितीचे अध्यक्ष अरविंद कुडतरकर व इतर सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच प्राचार्या बी.बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत
