कणकवलीतील जिल्हास्तरीय ‘मॅरेथॉन’ स्पर्धेत खुल्या गटातून दिपक फाले व सानिया तांबे विजेते 

कणकवली(तुळशीदास कुडतरकर)दि 2‌ सप्टेंबर २४

 

कणकवलीतील जिल्हास्तरीय ‘मॅरेथॉन’ स्पर्धेत खुल्या गटातून दिपक फाले व सानिया तांबे विजेते 

 

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व स्पोर्ट्स फॉउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ५ की. मी मॅरेथॉन स्पर्धा दि.१सप्टेंबर रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित ‘एक धाव मैदानासाठी’ या ‘मॅरेथॉन’ स्पर्धेत पुरुष खुल्या गटातून दिपक फाले याने त‌र महिला खुल्या गटातून कु.सानिया तांबे हिने बाजी मारली आहे.याशिवाय १९ ,१७,१४ व १२ वर्षांखालील मुला-मुलींच्या ३ कि.मी,२ किमी,व १ कि.मी धावणे मॅरेथॉन स्पर्धेत अनुक्रमे -प्रथमेश पुजारी,श्रद्धा घाडीगावकर,तनिष्का मुळीक,मेघा सातपुते,चितवाणी कासले,दिव्या सातपुते,श्रवण राणे,मनस्वी राणे यांनी आपआपल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले आहे.तर या मॅरेथॉन स्पर्धेचे सांघिक विजेतेपद ‘अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी आचरा क्लबने पटकावले आहे.या क्लबने या स्पर्धेत एकूण विविध वयोगटातील 14 गटात यश‌ संपादन केले असून त्यांनी या स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.या सर्व गुणवंत खेळाडूंचा व मार्गदर्शक प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विजेतेपदीची ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला.

स्पर्धेचा शुभारंभ श्रीम.श्रध्दा तळेकर व मधुरी घराळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाले.अनेक स्पर्धेत अटीतटीचे क्षण उपस्थितींना पाहण्यास मिळाले. या स्पर्धेत मुलींचाही सहभाग मोठा होता.

बक्षिस वितरण प्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारीच्या नुतन कोच व कुस्ती राष्ट्रीय खेळाडू माधुरी घराळ,कोच व राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रद्धा तळेकर,मधुरा कम्प्युटर सेंटर कणकवलीच्या संचालिका व प्रायोजक रश्मी बाइत, स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बाळा कदम, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाअध्यक्ष तथा कणकवली तालुका क्रीडा समन्वय बयाजी बुराण, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक तथा कासार्डे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,अॅथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव समीर राऊत, अॅथलेटिक्स असोसिएशन मुंबईचे टेक्निकल ऑफिसर व या स्पर्धेचे पंच सुधीर माळी, तायक्वांडो कोच व क्रीडा शिक्षक एकनाथ धनवटे,अनाजी सावंत,श्री.मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेला बयाजी बुराण,दत्तात्रय मारकड,बाळा कदम,समीर राऊत,सुधीर माळी,रिद्धी घाडीगावकर,प्रशांत शिरगावकर,स्वप्नील कदम,प्रथमेश किर्लोस्कर,अंजली गायकवाड आदींनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील यशस्वी खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन तसेच सहभागी खेळाडूंनाही प्रत्येकी मेडल व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

८ वर्षांच्या कबीरची ५कि.मी.ची धाव!
सावंतवाडी येथील कबीर जफर हेरेकर या फक्त ८ वर्षांच्या छोट्या खेळाडूंने खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन ५ किमी अंतर लिलया पुर्ण करून उपस्थितांची मने जिंकली. त्याची ही १३ वी मॅरेथॉन स्पर्धा आहे.तो सर्पमित्र म्हणून परिचित आहे.

गिरीधर कोरगावकर सर्वात लहान खेळाडू

 

या मॅरेथॉन स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सावंतवाडीतील ज्यु.केजीमधील साडेपाच वर्षांचा कु.गिरीधर नित्यानंद कोरेगावकर हा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला असून या दुसऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ६०० पेक्षा अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता.

मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-

पुरुष खुला गट ५की. मी.स्पर्धा-

प्रथम – दिपक फाले , द्वितीय क्रमांक- संकेत चव्हाण, तृतीय क्रमांक- निषाद परब.

महिला खुला गट ५की. मी.
प्रथम क्रमांक.-सानिया तांबे,द्वितीय क्रमांक.- रुई लाड, तृतीय क्रमांक.-निकिता लाड.

१९ वर्षाखाली मुले गट ५ की. मी.
प्रथम क्रमांक-प्रथमेश पुजारी,द्वितीय क्रमांक-आदित्य सुतार,तृतीय क्रमांक-देवराज घाडी.

१९ वर्षाखाली मुली गट ५ की. मी.
प्रथम क्रमांक.- श्रद्धा घाडीगावकर, द्वितीय क्रमांक.-.दिक्षा सूर्यवंशी, तृतीय क्रमांक.-. सानिया खरात.

१७ वर्षाखाली मुले गट ३ की. मी.
प्रथम क्रमांक.-.तनिष्क मुळीक, द्वितीय क्रमांक.-.सोहम गोळे, तृतीय क्रमांक.-.सुजल कासले.

१७ वर्षाखाली मुली गट ३ की. मी.
प्रथम क्रमांक.-.-मेघा सातपुते, द्वितीय क्र.-सेहा तेरसे, तृतीय क्रमांक.-प्रेक्षा सावंत.

१४ वर्षाखाली मुले गट २ की. मी.
प्रथम क्रमांक.-.- चितवानी कासले, द्वितीय क्रमांक.- आशीर्वाद सातपुते, तृतीय क्रमांक.- प्रज्वल चव्हाण.

१४ वर्षाखाली मुली गट २ की. मी.
प्रथम क्रमांक.- दिव्या सातपुते,द्वितीय क्रमांक.- आर्या ठाकूर,तृतीय क्रमांक.- अन्विका पवार
.

१२वर्षाखाली मुले गट १ की.मी.प्रथम क्रमांक-श्रवण राणे,द्वितीय क्रमांक.- मानस घाडी, तृतीय क्रमांक.-मेयाक आचरेकर.

१२ वर्षाखाली मुली गट १ की. मी. प्रथम क्रमांक.- मनस्वी राणे, द्वितीय क्रमांक.हर्षिता धुरी,तृतीय क्रमांक.- ऋतक्षी हुरकुडे

या स्पर्धेतील यशस्वी व सहभागी खेळाडूंचे स्पोर्ट्स फाऊंडेशनच्यावतीने तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्यावतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *