सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह.बॅक व इतर कर्मचारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 

कणकवली दि १ सप्टेंबर (प्रतिनिधी)

 

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह.बॅक व इतर कर्मचारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बैंक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग ची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज हॉल कुडाळ येथे संस्था अध्यक्ष प्रसाद कुंटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

याप्रसंगी सन २०२३-२४ सालात उत्तीर्ण झालेल्या सभासद पाल्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान सोहळा पार पाडला. संस्थेचा यावर्षी नफा हा २७ लाख ४२ हजार एवढा झालेला असून संचालक मंडळाने यावर्षी ११ टक्के दराने लाभांश देण्याचे जाहीर केलेले आहे. संस्थेने व्यवसायाचा १० कोटी चा टप्पा केला असून संस्था स्वभांडवलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तसेच संस्थेने सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी तसेच संस्थेचाच सेवानिवृत्त सभासदांनी संस्थेचे जास्तीत जास्त सभासद होऊन ठेवीत गुंतवणुक करावी तसेच पगार तारणावरती सुलभ प्रक्रियेने कर्ज उचल करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी उपस्थित संस्था अध्यक्ष श्री. प्रसाद कुंटे, उपाध्यक्ष श्री. आनंद परुळेकर, संचालक श्री. महेश गावडे, उदय शिरोडकर, शरद नारकर, सुंदर म्हापणकर, वसंतराव पाटोळे, राजेश कुडाळकर, दिलीप मसके, विनयश्री पेडणेकर, विकास घाडीगांवकर, मंगेश राऊत, अर्जुन नाईक, नितीन जठार, उदयसिंग रावराणे, संजय गावडे, शितल परुळेकर, संजय पाताडे, सचिव रामचंद्र दळवी, कर्मचारी वर्ग, सभासद, सेवानिवृत्त सभासद, गुणगौरव विदयार्थी‌ आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *