सावंतवाडी (हेमंत मराठे)२८ ऑगस्ट २०२४
सावंतवाडी न्हावेली उपसरपंच पदी अक्षय पार्सेकर यांची निवड
सावंतवाडी न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंचपदी अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामसेवकं राजेश परब, माजी उपसरपंच तसेच ग्रामपंचायात सदस्य संतोष नाईक, आरती माळकर, सागर जाधव, सानिका हळदणकर, निकिता परब, राजश्री कालवणकर, गजानन दळवी, युवा सामाजिक कार्यकर्ते समिर पार्सेकर, ओम पार्सेकर, सुंदर पार्सेकर, रुपेश नाईक, तुळशीदास पार्सेकर, विठ्ठल परब, राज धवण, सिद्धेश पार्सेकर, धनेश नाईक, अतुल चौकेकर, संतोष निर्गुण, पंप्या आरोंदेकर, विनायक कालवणकर आदी उपस्थित होते.
श्री पार्सेकर यांनी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्यानंतर न्हावेली गावातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा, गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यापासून ते ग्रामस्थांची छोटी- मोठी कामे ते कायमच करीत असतात. याच त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान यापुढे सुद्धा गावातील लोकांसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करीन, असे श्री. पार्सेकर यांनी यावेळी सांगितले.
