सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील चिरेखाणीवर डंपर पलटी होऊन त्यातील दगड डोक्यावर पडल्याने तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.सदर अपघाताची नोंद पोलिसात न करता परस्पर संगणमताने अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीला चिरे खाणीलगत असलेल्या सटी येथील माळारानावर दफन केले.हे प्रकरण उजेडात आल्यानंतर या प्रकरणात अपघात ग्रस्त डंपर चालक हिमु लमानी याला पोलिसांनी अटक करून आज सावंतवाडी दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआर मध्ये मृतदेह देण्यात आला होता.मुलीच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन झाले असून पुढील तपास करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.