बदलापूर घटनेचा महाविकास आघाडीने कणकवलीत केला निषेध 

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली दि २४ ऑगस्ट (प्रतिनिधी)

 

बदलापूर घटनेचा महाविकास आघाडीने कणकवलीत केला निषेध 

 

बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला महाराष्ट्र राज्यातून बंदला पाठिंबा असताना. हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत बंद मागे घेन्यात आला. सिंधुदुर्गात अत्याचार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले . यावेळी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून, आणि काळ्या फिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या माध्यमातून घटनेचा निषेध करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी कणकवली शहरात नाक्या नाक्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी आमदार वैभव नाईक ,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत ,महिला जिल्हा संघटक नीलम पालव ,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आमचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, बाळू मेस्त्री, योगेश मुंज, उत्तम लोके सचिन सावंत, आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले अशा घटना महाराष्ट्रात घडता कामा नये,सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावूर्वी जनतेने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून आंदोलने केलेली आहे. सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांसाठी दोन दोन महिने 144 कलम लावण्यात आलेले आहे. या जिल्ह्यातील लोकांचे दडपशाही करण्याचा काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *