वादळसदृश स्थिती,समुद्रात वादळाचे वातावरण ; मच्छिमारी ठप्प; गुजरात डहाणू येथील शेकडो नौका देवगड बंदरात दाखल

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड : प्रतिनिधी

 

वादळसदृश स्थिती,समुद्रात वादळाचे वातावरण ;मच्छिमारी ठप्प; गुजरात डहाणू येथील शेकडो नौका देवगड बंदरात दाखल

 

समुद्रातील मच्छिमारीला सुरूवात झाली खरी मात्र हवामान विभागाने २४ ऑगस्टपर्यत वादळाचा इशारा दिल्यामुळे मच्छिमारी ठप्प झाली असून गुजरात, डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.

खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरूवात झाली मात्र वातावरण पोषक नसल्याने पाच ते सहा दिवसांनी मासेमारी सुरू झाली.कांडाळी, न्हैय व यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी सुरू झाली.बांगडा, पापलेट, मोरी, कोळंबी, सौदांळे आदी मासळी मिळण्यास सुरूवात झाली मात्र पापलेट मोरीसारखी दर्जेदार मासळी मिळूनही त्यांना दर चांगला मिळाला नाही.नारळीपौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरूवात झाली असतानाच समुद्रात वादळसदृश वातावरण तयार झाल्याने मच्छिमारांने समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा हवामान विभागाने दिला यामुळे गुजरातसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या असून खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली आहे.२४ ऑगस्टपर्यंत वादळसदृश स्थिती आहे.सध्या समुद्रात मासळी मिळणेही दुरापास्त झाल्याने नौका देवगड बंदरातच उभ्या आहेत.वादळसदृश स्थिती निवाळल्यानंतर मासेमारीला सुरूवात होईल असे मच्छिमारांमधून सांगण्यात येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *