आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर सिंधुताई सपकाळ यांची प्रतिकृती साकारण्यात येणार – डाॅ. विद्याधर तायशेटे

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल व सोमस्थ अकादमी, वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर सिंधुताई सपकाळ यांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती २०० टॉवेल व ३०० साड्यांच्या माध्यमातून साकारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे व संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे यांनी दिली.

 

संजीवनी हॉस्पिटल, कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सहसचिव निलेश महिंद्रकर उपस्थित होते.

 

पुढे प्रा. भिसे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची व सामाजिक भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ज्ञानदा शिक्षण संस्था अनेक सामाजिक व सांस्कृतिक राबवित आहे. गेली ३ वर्ष विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. पहिल्या वर्षी १००० वाद्य वाजवून ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर ब्लँकेटच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

 

तसेच घड्याळांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देखील प्रतिकृती करण्यात आली होती. यावर्षी अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या चित्रकृती साड्या व टॉवेल यांच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. त्यानंतर वापरण्यात आलेल्या साड्या व टॉवेल्स वृद्धाश्रमाला मोफत देण्यात येणार आहेत.

तर डॉ. विद्याधर तायशेटे म्हणाले, लहान मुलांमध्ये तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी हा या उपक्रमा मागील उद्देश आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *