आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जन्मगावी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जन्मगावी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

देवगड : प्रतिनिधी

 

देवगड तालुका पत्रकार समितीतर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जन्मगावी पोंभुले येथे अभिवादन करण्यात आले.

 

पोंभुले येथे असलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी उभारलेल्या स्मारकात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या समवेत गावच्या सरपंच प्रियांका धावडे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर, बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर, बाजीराव जांभेकर, देवगड तालुका पत्रकार समितीचे सचिव दिनेश साटम, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आनंद लोके, कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाडेकर, देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, माजी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, कार्यकारिणी सदस्य स्वप्निल लोके, कोषाध्यक्ष महेश तेली, अनिल राणे, सुरज कोयंडे तसेच पत्रकार विष्णू धावडे, नागेश दुखंडे आदी उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *